आयपीएलचा मेगा लिलाव रियाधमध्ये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन प्रिमियर लीगचा हाय प्रोफाईल लिलाव या महिन्याच्या अखेरीस सौदी अरेबियातील रियाध येथे होणार असल्याचे बीसीसीआयने सोमवारी जाहीर केले.
‘आयपीएलचा या मोसमासाठीचा लिलाव रियाधमध्ये होणार असून त्याबाबत सर्व फ्रँचायजींना कळविण्यात आले आहे. 24 व 25 नोव्हेंबर या लिलावाची संभाव्य तारीख आहे,’ असे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले. यावेळच्या लिलावात अनेक बडे स्टार खेळाडू असल्याने त्याला विशेष महत्त्व आले आहे. रिषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग यांना त्यांच्या फ्रँचायजींनी मुक्त केल्याने त्यांचा लिलाव होणार आहे. सर्व फ्रँचायजींना मिळून एकूण 641.5 कोटी रुपये 204 जागांसाठी खर्च करायची आहे. या 204 पैकी 70 खेळाडू विदेशी असतील. आतापर्यंत 46 खेळाडूंना फ्रँचायजींनी रिटेन केले असून त्यासाठी दहा फ्रँचायजींनी मिळून 558.5 कोटी रुपये खर्च केले आहेत.