महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयपीएलचे प्रायोजकत्व टाटांकडेच

06:50 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुढील पाच वर्षांसाठी 2500 कोटींचा करार

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

टाटा समूह पुढील पाच वर्षे आयपीएलचे टायटल स्पॉन्सर राहणार आहेत. टाटा सन्सने आयपीएल 2024 ते 2028 च्या टायटल प्रायोजकत्वासाठी  दरवर्षी 500 कोटी रुपये म्हणजेच एकूण 2500 कोटी रुपयांची बोली लावली आहे. टाटा समूह पुढील पाच वर्षांत बीसीसीआयला आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपसाठी 2500 कोटी रुपये देणार आहे, सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.

गतवर्षी 12 डिसेंबर रोजी बीसीसीआयने या आयपीएल प्रायोजकत्वासाठी निविदा जारी केली होती. यामुळे यंदा आदित्य बिर्ला समूह देखील आयपीएलचे टायटल स्पॉन्सरशीप मिळविण्याच्या शर्यतीत होता, त्यांनीही 2,500 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, शेवटी टाटा समूहाने ही बोली जिंकली. टाटा समूह मागील दोन वर्षांपासून आयपीएलचा प्रायोजक आहे. आयपीएल 2022 आणि 2023 मध्ये प्रायोजकत्वासाठी टाटा समूहाने बीसीसीआयला 730 कोटी रुपये दिले. आयपीएलची वाढती क्रेझ तर आहेच, शिवाय येत्या सीझनमध्ये आयपीएल मॅचेसची संख्याही वाढणार आहे. आयपीएल 2024 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. आगामी काळात बीसीसीआयने आयपीएलचे सामने वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे पुढील पाच वर्षांचा काळ पाहता बीसीसीआयने रक्कमही वाढवली होती. दरम्यान, या स्पर्धेत बिर्ला समूहाला मागे टाकत टाटा समूहाने आयपीएलचे प्रायोजकत्व पुढील पाच वर्षासाठी मिळवले आहे. अर्थात, बीसीसीआयला यातून घसघशीत रक्कम प्राप्त होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#SportNews
Next Article