For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयपीएलची खेळी...सट्टेबाजांचे बळी

10:56 AM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयपीएलची खेळी   सट्टेबाजांचे बळी
Advertisement

बेटिंग हरणाऱ्यांची आत्महत्या, बुकी मात्र सुखी : जुगार, सट्टा, कॅसिनोपायी कर्जबाजारीपणामुळे होताहेत आत्महत्या

Advertisement

बेळगाव : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्यांपैकी बेळगाव परिसरातील अनेक जण आर्थिक अडचणीत आले आहेत. बेटिंगमुळे विस्कटलेली आर्थिक घडी काही केल्या पुन्हा नीट बसवता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर यापैकी काही जणांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे दिसून येते. टिळकवाडी येथील एका युवकाच्या आत्महत्या प्रकरणानंतर सट्टेबाजांचे धाबे दणाणले आहेत. आयपीएल क्रिकेट सामन्या दरम्यान जिंकण्याची आशा उरात बाळगून अनेक जणांनी आपल्या क्षमतेपेक्षा अधिक पैसा लावला आहे. यापैकी फार कमी जणांच्या नशिबी यश आले आहे. अपयशींची संख्याच अधिक आहे. टिळकवाडी येथील एका आत्महत्या प्रकरणानंतर पोलिसांनी दोन डायऱ्या ताब्यात घेतल्या होत्या. एका डायरीत बेळगाव येथील सट्टेबाज व बुकींच्या नावांचा उल्लेख आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, पोलिसांनी बुकींच्या यादीवर प्रकाश टाकण्यास टाळाटाळ केल्याचे समजते. मटका, जुगार असो किंवा बेटिंग असो, खाकीला हाताशी धरल्याशिवाय हे गैरधंदे चालत नाहीत. डायरीतील नावे पोलिसांच्या परिचयातीलच होती. त्यामुळे त्यांना पोलिसांनी पदराआड घेतले आहे. जर बुकींची नावे उघड झाली तर त्यांनी अधिकारी व पोलिसांची सेवा किती केली आहे? याचा भांडाफोड होणार, या भीतीनेच प्रकरणालाच कलाटणी दिली जात असल्याचा संशय बळावला आहे. दि. 20 मे रोजी ‘तरुण भारत’ने ‘हुबळी-धारवाड जात्यात तर बेळगाव सुपात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. जुगार, सट्टा व कॅसिनोपायी कर्जबाजारीपणामुळे वाढलेल्या आत्महत्यांवर प्रकाश टाकण्यात आला होता. आयपीएल सामने संपले तरी सट्टेबाजांच्या आर्थिक अडचणी संपल्या नाहीत. बेटिंगने अनेकांना कंगाल केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.