सांगोल्डा येथे आयपीएल सट्टेबाजी : तिघांना अटक
पणजी : साळगाव पोलिसांनी सांगोल्डा येथील एका व्हिलामध्ये छापा मारून आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या तीन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक मोबाईल व एक लॅपटॉप व अन्य साहित्य मिळून 1 लाख 20 हजार ऊपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितामध्ये मोहित छाबलानी (26), नितीनकुमार लक्ष्मणदास वालेचा (38) दोघेही गुजरात येथील आहेत. इमान झफर (22) हा औरंगाबाद-बिहार येथील आहे. शनिवारी अरारझाईस व्हिला क्रमांक 4, मरड सांगोल्डा येथे गुजरात टायटन्स विऊद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईलवर सट्टा घेणे सुऊ असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी कारवाई केली. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, पर्वरीचे उप विभागीय अधिकारी विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरक्षक अक्षय फातर्पेकर याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.