नवीन ट्रान्स्फरन्स आयकॉनसोबत आयफोन
अॅपलच्या वार्षिक परिषदेत कंपनीची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील दिग्गज स्मार्टफोन म्हणून ओळख असणाऱ्या आयफोनमधील फिचर्स अजून आकर्षक येणार आहेत. यामध्ये आयफोनची सर्व डिव्हाईस आता नवीन आयकॉन आणि इंटरफेससोबत प्राप्त होणार असल्याची माहिती कंपनीने नुकतीच दिली आहे.
अॅपलने आपल्या सर्वात मोठ्या वार्षिक कार्यक्रमात अपडेटेड ऑपरेटिंग सिस्टम आयओएस सादर केले आहे. आयओएसच्या या नवीन डिझाईनमध्ये ट्रान्स्फरन्स इंटरफेस येणार असून यामध्ये गोल आयकॉन आणि डायनॅमिक लॉक स्क्रीन मिळणार आहे. लॉक स्क्रिनवर टाईम वॉलपेपरच्या हिशोबाने अॅडजस्ट करता येणार आहे. या नव्या बदलामुळे 3डी इफेक्ट्स फोन हालल्यानंतर ग्राहकांना दिसून येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
आयओएसच्या सर्व ऑपरेटिंग सिस्टम आयपॅड ओएस 26, मॅक ओएस26 , वॉच ओएस26, टीव्हीओएस 26 आणि व्हिजनओएस 26 आदीचा यामध्ये समावेश राहणार आहे. विकसित करण्यात आलेल्या नवीन प्रणालीनुसार या सिस्टम बीटा व्हर्जनमध्येच उपलब्ध आहेत आणि सार्वजनिक बीटा जुलै 2025 मध्ये प्राप्त होणार असल्याचीही माहिती आहे. सप्टेंबर 2025 मध्ये सर्व ग्राहकांना आयफोन, आयपॅड, मॅक, अॅपल वॉच आणि व्हिजन प्रो यांचे अपटेड नवीन फिचर्सचा वापर करण्याची संधी मिळणार आहे.
आयफोनमध्ये दुसरा मोठा बदल म्हणजे आयफोन 16 च्या कॅमेरा नियंत्रित बटनासोबत काम करता येणार आहे. यात ऑब्जेक्ट, प्लेस, टेक्स्ट या स्क्रीन कंटेट स्कॅन करुन माहिती देणार आहे.