आयफोन 18 प्रो मॅक्ससप्टेंबरमध्ये दाखल होणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दिग्गज आयटी कंपनी अॅपल पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात आयफोन 18 प्रो मॅक्स लाँच करणार आहे. आयफोन 18 मालिकेच्या किंमतीबद्दल लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स या मॉडेलचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान या मॉडेल्सची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा खूप जास्त असू शकते, असे म्हटले जात आहे. मात्र, अॅपलने अद्याप किंमत, लॉन्च डेट आणि फीचर्सबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
आयफोन 18 ची किंमत किती असेल?
माहितीनुसार, भारतात आयफोन 18 प्रो ची सुरुवातीची किंमत सुमारे 1,39,900 रुपये असू शकते. त्याच वेळी, आयफोन 17 प्रो ची सुरुवातीची किंमत रु. 1,34,900 असण्याची शक्यता आहे. याशिवाय, काहींकडून असा दावा करण्यात आला आहे की 256जीबी मॉडेलची किंमत 1,44,900 रुपयांपर्यंत असेल, म्हणजेच स्टोरेजच्याबाबतीत ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो.
आयफोन 18 ची वैशिष्ट्यो
अॅपल आयफोन 18 प्रो मॅक्सला नवीन ए20 प्रो चिपसेट असू शकते. ही चिप टीएसएमसीच्या 2 एनएम तंत्रज्ञानावर बनवण्यात आली आहे. यामुळे फोनच्या कार्यक्षमतेसह बॅटरीची कार्यक्षमता सुधारण्याची अपेक्षा आहे. नवीन फोनमध्ये 12 जीबी रॅमचीही चर्चा आहे.