आयफोन-16 ची सर्वाधिक विक्रीची नोंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बजेटमधील तसेच मध्यम गटातील फोन्सनी 2025 मध्ये आपली उपस्थिती दाखवलेली असली तरी अॅपलनेच फोन विक्रीत अव्वलता प्राप्त केल्याचे दिसून आले आहे. भारतात 2025 मध्ये सर्वाधिक फोन विक्रीत अॅपलचा आयफोन-16 हाच बाजी मारु शकला आहे. 2025 च्या 11 महिन्यात हाच फोन ग्राहकांकडून मागणीत होता.
कौंटरपॉइंटच्या संशोधन अहवालात दिलेल्या माहितीनुसार अॅपलने 65 लाख आयफोन-16 ची विक्री केली आहे. तर दुसरीकडे विवोचा वाय29 5जी फोन 47 लाख इतके विक्री झाले हेते. आयफोन 16 व विवोच्या वाय29 5जी या दोन फोनच्या किमतीत बरेच अंतर होते. तरीही आयफोन-16ला सर्वाधिक ग्राहकांनी पसंत केल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे आयफोन-15 हा आघाडीवरच्या 5 फोनमध्ये स्थान राखले आहे. हे पाहता एक लक्षात येतं की आता ग्राहक बजेटमधील फोनला नाकारत आहेत. आयफोन महागडा असला तरी इएमआय, कार्ड ऑफर व कॅशबॅक सारख्या पर्यायांमुळे ग्राहकांना तो घेणे अधिक सोयीस्कर हेते आहे. ग्राहकांचाही फोन खरेदीबाबतचा कल आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबामुळे बदलला आहे. 2025 मध्ये 158 दशलक्ष स्मार्टफोन्सची भारतात शिपमेंट होईल असाही अंदाज बांधला जात आहे.