निमंत्रितांच्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेला प्रारंभ
10:14 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : टिळकवाडी येथील अॅट व्रुबेल स्नूकर अकादमी आयोजित निमंत्रीतांच्या आंतरराज्य स्नूकर स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. अनेक दिग्गज राष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश झाला आहे.टिळकवाडी येथील अॅट व्रुबेल स्नुकर अकादमीच्या सभागृहात या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी या स्पर्धेत एम. अली-मुंदगोड वि. अश्विन के.-बेळगाव (68-18, 57-17, 68-35) अशा सरळ 3-0 गेम्समध्ये, दुसऱ्या सामन्यात वैभव जी.बेळगावने सलमान-बेळगावचा (54-40, 33-43, 58-39, 68-18) अशा 3-1 गेम्समध्ये, तिसऱ्या सामन्यात डॉ. शोएब-बेळगाव वि. अमित एम.-बेळगाव (54-40, 33-43, 58-43, 69-18) अशा 3-1 फ्रेम्समध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले.संगमेश हुबळी, साद इचलकरंजी, पियुश एल.-कोल्हापूर, प्रथमेश ए.-बेळगाव हे पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
Advertisement
Advertisement