For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरवडे -कोनापाल येथे २३ रोजी निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

03:29 PM Nov 19, 2023 IST | अनुजा कुडतरकर
निरवडे  कोनापाल येथे २३ रोजी निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
श्री देवी भराडी रवळनाथ देवस्थान निरवडे कोनापाल आयोजित अंखड हरिनाम सप्ताहानिमित्त निरवडे कोनापाल येथे श्री देवी भराडी मंदिरात गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ५ वाजता उद्धाटन व ६ वाजल्यापासून भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

Advertisement

यात सायंकाळी ६ वाजता विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ,आंबेगाव ( बुवा- गोविंद मेस्री ) सायंकाळी ६.४५ वाजता उमळकर प्रासादिक भजन मंडळ,कुडाळ ( बुवा - अमित उमळकर ) रात्री ७.३० वाजता महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी ( बुवा - प्रसाद आमडोसकर ) रात्री ८.१५ दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ,वैभववाडी ( बुवा - विराज तांबे ) रात्री ९ वाजता लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ,कणकवली ( बुवा- योगेश मेस्री ) रात्री ९.४५ मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ,नेरुर ( बुवा - भार्गव गावडे ) रात्री १०.३० वाजता समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ, मळगांव ( बुवा - गौरांग राऊळ ) रात्री ११.१५ वाजता ईसवटी प्रासादिक भजन मंडळ,मातोंड ( बुवा - सचिन सावंत ) रात्री १२ वाजता सद्गगुरुनाथ प्रासादिक भजन मंडळ,तुळस ( बुवा - सिद्धेश नाईक ) रात्री १२.४५ वाजता रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ( बुवा - रुपेश यमकर ) हे संघ सहभागी होणार आहे. प्रथम पारितोषिक ७००१ रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक ५००१ रुपये व सन्मानचिन्ह,तृतीय पारितोषिक ३००१ रुपये व सन्मानचिन्ह,उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक १५०१ रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक १५०१ रुपये व सन्मानचिन्ह तसेच उकृष्ट गायक - १००१ व सन्मानचिन्ह,उकृष्ट हार्मोनियम - १००१ व सन्मानचिन्ह,उकृष्ट पखवाज - १००१ रुपये व सन्मानचिन्ह,उकृष्ट तबला - १००१ रुपये व सन्मानचिन्ह,उकृष्ट झांजवादक - १००१ रुपये व सन्मानचिन्ह,उकृष्ट कोरस - १००१ रुपये व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.