For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे योगींना निमंत्रण

06:18 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे योगींना निमंत्रण
Advertisement

जीवन धन्य झाल्याचे काढले उद्गार

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

अयोध्येत श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित असतील. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या या भेटीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज माझे जीवन धन्य झाल्याचे उद्गार काढले आहेत.

Advertisement

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी स्वामी गोविंददेव गिरि महाराज, चंपत राय, राजेंद्र पंकज यांनी राम जन्मभूमी मंदिरात भगवान रामलल्ला सरकारच्या नुतन बालरुप विग्रहाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केले आहे अशी माहिती योगींनी सोशल मीडियावर दिली आहे.

श्रीराम जन्मभूमी मुक्ती यज्ञाशी गोरक्षपीठ सातत्याने जोडलेले राहिले आहे. ब्रिटिश कालखंडात श्रीराम मंदिराच्या मुद्द्याला आवाज देण्याचे काम महंत दिग्विजयनाथ महाराज यांनी केले होते. त्यांच्यानंतर महंत अवैद्यनाथ यांनी राम मंदिरासाठी लढा दिला होता. 1984 मध्ये अयोध्येच्या वाल्मिकी भवनात श्रीराम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीची स्थापना झाली असता सर्वसंमतीने तत्कारीन गोरक्षपीठाधीश्वर महंत अवेद्यनाथ यांची याच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.

पंतप्रधान मोदी मुख्य यजमान

22 जानेवारी रोजी अयोध्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे मुख्य यजमान असणरा आहेत. काही दिवसांपूर्वीच श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जात मोदींना निमंत्रणपत्रिका सोपविली होती.  या सोहळ्याकरता हजारो साधूसंतांना निमंत्रित केले जाणार आहे. याचबरोबर साडेचार हजार अतिथी या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Tags :

.