महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोनिया, मनमोहन, देवेगौडांना राममंदिर सोहळ्याचे निमंत्रण

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सोनिया गांधी, मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना निमंत्रण देण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार असून आता विरोधकांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या शिष्टमंडळाने काँग्रेस नेत्यांना निमंत्रण दिले आहे. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्मयता कमी आहे. या सोहळ्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच. डी. देवेगौडा यांनाही निमंत्रण पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ट्रस्टशी संबंधित लोकांच्या शिष्टमंडळाने हे निमंत्रण दिले आहे. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनाही निमंत्रणे पाठवली जाणार आहेत. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी पूज्य संतांसह प्रत्येक क्षेत्रात देशाचा सन्मान राखण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व प्रमुख व्यक्तींना निमंत्रण देण्यात येणार आहे. या सोहळ्यात विविध पंथातील सुमारे 4,000 संत सहभागी होण्याची शक्मयता आहे. तसेच अयोध्येतील प्रत्येक घराला प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित केले जाईल. या नियोजनासाठी 500 टीम तयार करण्यात आल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article