For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजू पवार डान्स अकादमीच्या वर्धापनदिन गोवा मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

06:22 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजू पवार डान्स अकादमीच्या वर्धापनदिन गोवा मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

येथील राजू पवार डान्स अकादमीच्या 31 व्या वर्धापनदिनासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस हा कार्यक्रम पणजी येथील कला अकादमीत होणार आहे.

बेळगावात नृत्यकलेचा आविष्कार घडवून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या या अकादमीने अनेक सिनेकलावंतांना यापूर्वी बेळगावात बोलावून या कार्यक्रमांचा आस्वाद बेळगावच्या रसिक प्रेक्षकांना दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राजू पवार डान्स अकादमीच्या 31 व्या वर्धापनदिनासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Advertisement

नुकतेच राजू पवार, डॉ. आदित्य सावंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वर्धापन दिनासाठी त्यांना निमंत्रित केले आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक महनीय व्यक्ती, सिनेकलावंत वर्धापनदिन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अकादमीचे संचालक राजू पवार यांनी दिली.

Advertisement
Tags :

.