सीमोल्लंघन कार्यक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरांना आमंत्रण
बेळगाव : बेळगाव शहरात विजयादशमी दिवशी सीमोल्लंघन कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने केला जातो. गुरुवार दि. 2 रोजी सायंकाळी पाच वाजता मराठी विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. शहर देवस्थान मंडळाच्यावतीने निमंत्रण देण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांना सीमोल्लंघन कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच त्या दिवशी सायंकाळी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली. त्याचबरोबर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त नारायण बरमणी, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी यांच्यासह इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी शहर देवस्थान पंच मंडळाचे रणजीत चव्हाण-पाटील, सुनील जाधव, गणेश दड्डीकर यांसह इतर उपस्थित होते.