ओलाच्या बैठकीवर गुंतवणूकदारांचे लक्ष
वृत्तसंस्था/ मुंबई
ओला इलेक्ट्रीक कंपनीच्या समभागावर गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शनिवार 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. निधी उभारणीबाबतचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसात समभागाच्या भावात चढउतार दिसतो आहे. शुक्रवारी 2.5 टक्के इतका समभाग खाली आला होता. समभागांच्या माध्यमातून किंवा सेक्युरिटीजच्या माध्यमातून भांडवलात वाढ करण्याचा इरादा कंपनीचा असल्याचे बोलले जात आहे. प्रायव्हेट प्लेसमेंट, क्वालीफाइड इन्स्टिट्यूशन्स प्लेसमेंट, प्रीफरेंन्शीयल इशु वा इतर पर्यायामार्फत निधी उभारणीची योजना कंपनी जाहीर करु शकते, असेही सांगितले जात आहे. सदरचा निधी उभारणीचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी समभागधारकांची मंजुरी मिळवली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मंगळवारी सदरचा कंपनीचा समभाग 2.6 टक्के घसरणीसोबत 53 रुपयांवर बंद झाला होता. वर्षात पाहता समभागाने 102 रुपयांवर मागच्या डिसेंबरमध्ये झेप घेतली होती. तर वर्षात 39 रुपये भावाची नीचांकीही 14 जुलै रोजी अनुभवली आहे.