For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टेक महिंद्राच्या ‘व्हिजन 2027’मुळे गुंतवणूकदार उत्साहात

06:42 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
टेक महिंद्राच्या ‘व्हिजन 2027’मुळे गुंतवणूकदार उत्साहात
Advertisement

मंदावलेल्या व्यवसायाला गती देण्याचा कंपनीचा प्रयत्न

Advertisement

नवी दिल्ली :

चौथ्या तिमाहीचे कमकुवत निकाल असूनही, टेक महिंद्राचे समभाग, बाजार भांडवलानुसार भारतातील पाचवी सर्वात मोठी आयटी कंपनी, आज 10 टक्क्यांच्या वाढीसह वरच्या सर्किटला धडकले आहेत. इंट्रा-डे ट्रेडमध्ये कंपनीच्या समभागांची किमत ही बीएसईवर 1,309.30 रुपये झाली. टेक महिंद्राचे ‘व्हिजन 2027’ हे समभाग वाढण्याचे कारण आहे.

Advertisement

मोहित जोशी यांनी केले ‘व्हिजन 2027’ सादर

25 एप्रिल रोजी चौथ्या तिमाहीच्या निकालांसोबतच, कंपनीचे सीईओ आणि एमडी मोहित जोशी यांनी आयटी सेवा प्रमुखांच्या मंदावलेल्या व्यवसायाला गती देण्यासाठी तीन वर्षांचा रोडमॅप ‘व्हिजन 2027’ सादर केला. ज्याचे उद्दिष्ट आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यासाठी आर्थिक वर्ष 2027 पर्यंत महसूल वाढ आणि मार्जिन सुधारणा करण्याचे आहे. टेक महिंद्राच्या या योजनेमुळे गुंतवणूकदारही उत्साहित आहेत.

चौथ्या तिमाहीतील आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 41 टक्क्यांनी घसरून 661 कोटी रुपयांवर आला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते 1,117.70 कोटी रुपये होते. नफ्यात लक्षणीय घट होऊनही कंपनीने पुढील तीन वर्षांसाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे आखली आहेत.

Advertisement
Tags :

.