निकालापूर्वीच गुंतवणूकदार सावध !
सेन्सेक्स 220 तर निफ्टी 44 अंकांनी प्रभावीत होत बंद : लोकसभा निकालाची उत्सुकता
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी चढउताराची स्थिती राहिली होती. यामध्ये सलगच्या तिसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. लोकसभेचा निकाल जाहीर होण्यास काही दिवसच शिल्लक असून त्याच्या अगोदरच गुंतवणूकदार अधिक सावध झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. मंगळवारच्या सत्रात नफा वसुली राहिल्याने बाजार घसरणीसह बंद झाला.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 0.29 टक्क्यांसह 220.05 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 75,170.45 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली होती. मात्र निफ्टी दिवसअखेर 44.30 अंकांनी घसरुन निर्देशांक 22,888.15 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, टाटा मोर्ट्स, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक आणि मारुती सुझुकी यांचे मुख्य समभाग हे प्रभावीत राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये मंगळवारी एशियन पेन्ट्स, विप्रो, जेएसडब्लू स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग मात्र वधारुन बंद झाले.
का घसरला बाजार ?
1.लोकसभा निवडणुकीचा निकाल सादर होण्याअगोदरच भारतीय बाजारात गुंतवणूकदार सावध झाले आहेत. यामुळे बाजारात चढउतार राहिल्याने मोठी घसरण राहिली.
- शनिवारी सादर होणाऱ्या एक्झिट पोलच्या अगोदरच गुंतवणूकदार सावध पाऊल टाकत असल्याने बाजारात नफावसुलीचे चित्र राहिले.
3.यासह निर्देशांकांमध्ये मजबूत स्थिती ठेवणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसी यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाल्याचा परिणाम हा सेन्सेक्स व निफ्टीत मंगळवारी झाला.
शनिवारी एक्झिट पोल सादर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी सतर्क होत आपले अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच जुलैमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामध्ये संरक्षण, पायाभूत सुविध , रेल्वे आदी क्षेत्रांमधील समभागांचे बुकिंग होण्याची शक्यता शेअर बाजार अभ्यासक आतच व्यक्त करत आहेत. याचाही प्रभाव बाजारात राहिला होता.
आशियामधील बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोजिट व हाँगकाँगचा हँगसेंग यांचे निर्देशांक हे घसरणीसह बंद झाले.