गोल्ड इटीएफमध्ये तीनपट वाढली गुंतवणूक
2023 मध्ये 2932 कोटी रुपयांची भर: सलग तिसऱ्या तिमाहीत गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये भारतात गोल्ड इटीएफमध्ये 2932 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यंदा गुंतवणूक पाचपट वाढली आहे.
वर्ष 2022 मध्ये गोल्ड इटीएफमध्ये 458 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. देशात 15 गोल्ड इटीएफमध्ये डिसेंबर 2023 मध्ये 88 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. याआधीच्या म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात 337 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये सलग तिसऱ्या तिमाहीत गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूक झाली आहे.
या दोन महिन्यात रक्कम काढली
2023 या कॅलेंडर वर्षात जानेवारी व मार्च या दोन महिन्यात रक्कम काढून घेतली गेली. 199 कोटी आणि 266 कोटी वरील महिन्यात इटीएफमधून काढण्यात आले आहेत. ऑगस्टमधील यातील गुंतवणूक ही 17 महिन्यानंतर सर्वोच्च राहिली आहे. 1028 कोटी रुपये गोल्ड इटीएफमध्ये गुंतवले आहेत. यापाठोपाठ ऑक्टोबरमध्ये 841 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. सोन्याच्या किमतीत तेजी असताना गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे.
का वाढली गुंतवणूक
सोन्याची खरेदी केंद्रीय बँकेकडून होत आली आहे. जागतिक स्तरावर महागाई दर उच्चांकी राहण्यासोबत जागतिक अर्थव्यवस्थेत सुस्ती आल्याने गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूक झालेली पाहायला मिळाली.