For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीपीटी हेल्थकेअरच्या आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी

07:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
जीपीटी हेल्थकेअरच्या आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी
Advertisement

26 फेब्रुवारीपर्यंत बोली लावता येणार

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

जीपीटी हेल्थकेअर लिमिटेडचा आयपीओ गुरुवारपासून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदार 26 फेब्रुवारीपर्यंत  या आयपीओसाठी बोली लावू शकतील. 29 फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जातील. जीपीटी हेल्थकेअरला या आयपीओद्वारे 525.14 कोटी रुपये उभारायचे आहेत. यासाठी, कंपनी 40 कोटी किमतीचे 2,150,537 ताजे समभाग सादर करत आहे. कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार 485.14 कोटी किमतीचे 26,082,786 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकतील, असे सांगितले जात आहे.

Advertisement

आयपीओ किंमत

जीपीटी हेल्थकेअर लिमिटेडने सदरच्या आयपीओसाठी 177-186 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉटसाठी बोली लावू शकतात. उदा. 80 शेअर्स. आयपीओच्या वरच्या प्राइस बँडवर रु. 186 वर 1 लॉटसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला 14,880 गुंतवावे लागतील.

ज्युनिपर हॉटेल्स आयपीओत संधी

लक्झरी हॉटेल क्षेत्रातील ज्युनिपर हॉटेल्सचा आयपीओ 21 फेब्रुवारीपासून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत पैसे गुंतवण्याची संधी असेल.

Advertisement
Tags :

.