For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

17 हजार 425 कोटीची बाजारात गुंतवणूक

07:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
17 हजार 425 कोटीची बाजारात गुंतवणूक
Advertisement

नवी दिल्ली : विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 17 हजार 425 कोटी रुपये गुंतवले आहेत अशी माहिती मिळते आहे. 18 एप्रिलला संपलेल्या आठवड्यात 8500 कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी केली होती. लक्षात घ्या की सदरच्या आठवड्यात दोन दिवस सुटीमुळे तीनच दिवस शेअरबाजाराचे कामकाज झाले होते. 21 ते 25 एप्रिल या दरम्यानच्या काळामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी एकंदर 17,425 कोटी रुपये शेअरबाजारात गुंतवले आहेत तर दुसरीकडे एप्रिलमध्ये आतापर्यंत 5678 कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून काढून घेतले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.