For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हायब्रिड म्युच्युअल फंडात 1.6 लाख कोटींची गुंतवणूक

06:47 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
हायब्रिड म्युच्युअल फंडात 1 6 लाख कोटींची गुंतवणूक
Advertisement

वृत्तसंस्था,नवी दिल्ली

Advertisement

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा कल पाहता ती हायब्रिड म्युच्युअल फंडात अधिक वळलेली आहे, असे दिसून आले आहे. या फंडात आर्थिक वर्षात 1.6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. नोंद घेण्यासारखे म्हणजे मागच्या आर्थिक वर्षापेक्षा ही गुंतवणूक 29 टक्के अधिक आहे.

बाजारातील एकंदर अस्थिरता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी हायब्रिड म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे योग्य मानले होते. अमेरिका इराण यांच्या युद्धाने बाजारातील माहोल पुर्णपणे बिघडलेला होता. शिवाय रुपयाची घसरण व कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी लक्षणीय वाढ यामुळे गुंतवणूकदार सावधगिरी बाळगून होते. भूराजकीय अस्थिर स्थिती असताना गुंतवणूकदारांनी सर्व विचारांती हायब्रिड फंडामध्ये गुंतवणूक करणे योग्य मानले.

Advertisement

मार्च 2026 पर्यंत एकूण व्यवस्थापनअंतर्गत मालमत्ता हायब्रिड योजनांमध्ये 10.35 लाख कोटी रुपयांवर पोहचली होती. यात 17 टक्के इतकी वाढ दिसली आहे. दुसरीकडे हायब्रिड फंड गुंतवणूकदार खातेदारांची संख्या 1.9 कोटींवर पोहचली तर 34 लाख नवी खाती उघडण्यात आली आहेत.

प्रकार पाहुया

मल्टीअसेट प्रकारातील फंडांनी चांगली कामगिरी केली असून यांच्या व्यवस्थापनांतर्गत मालमत्तेत 65 टक्के इतकी वाढ झाली आहे. इक्वीटी, डेट व कमोडिटीज जसे की सुवर्ण यात गुंतवणूक झाली आहे. बॅलन्सड अॅडव्हांटेज फंडस् - इक्वीटी व डेट आधारीत अशी गुंतवणूक असून बाजारातील अचानक घसरणीचा यावर कमी परिणाम होत होता. आर्बिटाज फंडस् - जोखीम आधारीत सुरक्षित पर्याय म्हणून यामध्ये गुंतवणूक करण्यात येते.

Advertisement
Tags :

.