डाटा सेंटर्समधील गुंतवणूक 20 अब्ज डॉलरची होणार
2025 पर्यंत टप्पा गाठणार ः एका अहवालामधून माहिती
नवी दिल्ली
भारतातील डाटा सेंटर (डिसी) मार्केट 2025 पर्यंत 20 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणार असल्याचा अंदाज प्रॉपर्टी कन्सल्टन्सी सीबीआरइच्या अहवालातून मांडण्यात आला आहे. सदरच्या माहितीनुसार, गुंतवणूकदार अधिक स्थिर उत्पन्न देणाऱया मालमत्तेचा शोध घेत असल्याने बाजार वाढत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘डाटा सेंटर्स इन इंडियाः एम्पॉवरिंग रिअल इस्टेट इन द एरा ऑफ मोअर डाटा’ असे नमूद करतो की वाढत्या डिजिटायझेशन आणि धोरणात्मक प्रोत्साहनांमुळे भारतातील डाटा सेंटरची मागणी वाढली आहे. कोविड-19 महामारीनंतर तंत्रज्ञानाच्या अवलंबाद्वारे डाटाचा वापर झपाटय़ाने वाढला आहे.
2025 च्या अखेरीस डाटा सेंटर्समधील एकूण गुंतवणूक 20 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ 2025 पर्यंत आणखी सहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित असल्याचेही यामध्ये स्पष्ट केले आहे.
मागील पाच वर्षांतील गुंतवणूक
सीबीआरइच्या मते, गेल्या पाच वर्षांत देशातील डाटा सेंटर मार्केटमध्ये 14 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे.