For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाघवडे सराफी दुकान फोडीचा तपास यशस्वी

01:03 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाघवडे सराफी दुकान फोडीचा तपास यशस्वी
Advertisement

बेंगळूरच्या युवकाला अटक : 22 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई

Advertisement

बेळगाव : मच्छे येथील वाघवडे क्रॉसजवळ असलेल्या सराफी दुकान फोडल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बेंगळूर येथील एका युवकाला अटक केली आहे. तसेच त्याच्याजवळून 21 लाख 57 हजार 250 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. श्रीनिवास एन. ऊर्फ सिना ऊर्फ सिनू नरसय्या (वय 37) मूळचा राहणार कोरटगेरे, जि. तुमकूर, सध्या राहणार लग्गेरे-बेंगळूर असे त्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर, उपनिरीक्षक संतोष दळवाई, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 18 जानेवारी 2026 रोजी शहापूर येथील महेश गोकुळ काकतीकर यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. वाघवडे क्रॉसजवळील महेश यांचे सराफी दुकान फोडून चांदीचे दागिने पळविण्यात आले होते. यासंबंधी एफआयआर दाखल करून पोलिसांनी तपास हाती घेतला होता.

8 किलो 29 ग्रॅम चांदी जप्त

Advertisement

विशेष पथकातील अधिकारी व पोलिसांनी श्रीनिवास एन. ला अटक करून त्याच्याजवळून 20 लाख 57 हजार 250 रुपये किमतीचे 8 किलो 29 ग्रॅम चांदी व गुन्ह्यासाठी वापरलेली दीड लाख रुपये किमतीची केए 03 एसी 8668 क्रमांकाची इंडिका कार असा एकूण 21 लाख 57 हजार 250 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

Advertisement
Tags :

.