सोहम नाईक याच्या विरोधात तपास तीव्र
पणजी : कुडचडे वासनाकांड प्रकरणातील संशयित सोहम सुशांत नाईक याच्या विरोधातील तपास अधिक तीव्र होत असून, गुन्हे शाखेने आधीच चार तक्रारी नोंद केल्या असून आज सोमवारी आणखी एक तक्रार नोंद करण्यात येणार आहे. पीडितांच्या नवीन जबाबांच्या आधारे पोलिसांना ठोस पुरावे मिळाले असून त्याच्या आधारे ही तक्रार नोंद केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले, पोलिस अधिकाऱ्यांनी आतापर्यंत दोन पीडितांचे जबाब नोंदवले आहेत, तर किमान आणखी तीन व्यक्तींचे, जे कथितरित्या भावंडं आहेत, त्यांचे जबाब सध्या नोंदवले जात आहेत. या घडामोडींवरून असे संकेत मिळतात की, जसजशी अधिक प्रकरणे समोर येतील, तसतसे हे प्रकरण आणखी विस्तारू शकते. संशयित सोहम नाईकने अनेक तरुणींना लग्नाचे वचन देऊन फसवल्याचा आणि नंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत पाच पीडितांच्या जबान्या नोंद करण्यात आल्या असून चार तक्रारी नेंद करण्यात आल्या आहेत. आज सोमवारी पाचवी तक्रार नोंद केली जाणार असल्याची शक्यता आहे.