महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चॅटिंगसाठी व्हॉटस्अपचे व्हॉईस चॅट फीचर सादर

06:16 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

मेटाचे मेसेजिंग अॅप व्हॉटस्अप यांनी व्हॉइस चॅट हे नवे फिचर सादर केले असून मोठ्या समूहाकरीता चॅटिंगसाठी हे फिचर उपयुक्त ठरणार आहे. या नव्या फिचरअंतर्गत समूहातील कमीत कमी 33 जण व जास्तीत जास्त 128 इतके चॅटिंगमध्ये एकत्र सहभागी होऊ शकणार आहेत. अलीकडेच कंपनीने बीटा वापरकर्त्यांसाठी हे फीचर जारी केले होते. पण आता हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध करण्यात आल्याचे व्हॉटस्अपने म्हटले आहे. हे एक व्हॉइस कॉलिंग फीचर असून याच्या मदतीने व्हॉटस्अप समूहात एकमेकांशी सामुहिकरित्या संपर्क साधणे शक्य होणार आहे.

Advertisement

समूहात कॉल आल्यानंतर वापरकर्त्याला टेक्स्ट मेसेज, फोटो सेंड करणे असे पर्यायही वापरता येणार आहेत. कॉलिंग दरम्यान वापरकर्ते पर्सनल चॅटिंग करु शकतात.

फीचर कसे वापराल...

? व्हॉटस्अपवर व्हॉइस चॅट सुरु करण्यासाठी ग्रुप चॅटवर टीक करा

?स्क्रीनच्या वरती डाव्या कोपऱ्यात न्यू वेव्हफॉर्म बॅनर ऑप्शनवर टॅप करा

?व्हॉटस्अपवर व्हॉईस चॅट करण्यासाठी स्टार्ट व्हॉयर्स चॅट ऑप्शनवर क्लीक करा

?आपण व्हॉईस चॅटमधून बाहेर पडणार असाल तर एक्स आयकॉनवर क्लीक करा.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article