‘एथर’च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर
यात अधिक क्षमता असणाऱया बॅटरीची सुविधा
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीमधील दिग्गज कंपन्यांपैकी एक असणारी एथर एनर्जी यांनी आपली नवीन स्कूटर एथर 450 एक्स व 450 प्लस जेन 3 यांचे सादरीकरण केले आहे. कंपनीने या गाडीची सुरुवातीची किमत 1.55 लाख रुपये ठेवली असल्याची माहिती यावेळी दिली आहे.
सदरच्या स्कूटरला ग्राहकांना आपल्या मोबाईल ऍपशी कनेक्ट करुन त्याचे चार्जिंग व अन्य स्थिती फोनवर बघण्याची सुविधा मिळणार असल्याचे म्हटले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरु होणार आहे, तरीही कंपनीने प्री बुकिंग आणि चाचणी राइड याला सुरुवात केली आहे.
स्कूटरचे मायलेज 146 किलोमीटर
नवीन एथर 450 एक्स जेन 3 मध्ये अगोदरच्या तुलनेत 25 टक्क्यांनी अधिक आकर्षक राहणार आहे. स्कूटरमध्ये चार राइड मोड-ईको, राइड, स्पोर्ट आणि वॉर्प मिळणार आहे. पूर्ण चार्जिंगमध्ये स्कूटर 146 किलोमीटरचे मायलेज देते , तर प्रत्यक्ष मायलेज 105 किलोमीटरचे देते. तसेच एथर 450 प्लसचे मायलेज हे 100 किमी ते 108 किमी पर्यंत राहणार आहे.
टायरमधून मिळणार अधिकची ग्रीप
स्कूटरमध्ये विविध फिचर्स देण्यात आले असेल तरी यामध्ये वापरण्यात आलेला टायर हा विशेष असून तो सामान्य टायरच्या तुलनेत 20 टक्के अधिक ग्रीप घेत असल्याचे दिसून येते. हा टायर सर्व हवामानात वापरण्यास अनूकुल असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
अन्य बाबी...
- एथर 450 एक्स, 450 प्लस जेन 3 यांची टक्कर ओला एस 1 प्रो, टीव्हीएस आयक्यूब व बजाज चेतक यांच्यासोबत होणार
- विक्रीमध्ये 5 व्या स्थानी एथर एनर्जी
- दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नवीन सिंगल कास्ट, ऍल्युमिनिअम रियर व्ह्यू मिरर मिळतो.