रेंज रोव्हर इव्होकची आवृत्ती सादर
67.90 लाख रुपये किमत राहणार : अत्याधुनिक फिचर्ससोबत गाडी बाजारात
नवी दिल्ली
जॅग्वार लॅड रोव्हर इंडियाने रेंज रोव्हर पोर्टफोलिओमध्ये एंट्री लेव्हल रेंज रोव्हर इव्होकची 2024 ची आवृत्ती बाजारात सादर केली आहे. कंपनीकडून कॉस्मेटिक अपडेट्सह फेसलिफ्टेड रेंज रोव्हर इव्होक 67.90 लाख रुपयांच्या किमतीसोबत सादर करण्यात आल्याची माहिती आहे. लक्झरी एसयूव्हीमध्ये पिव्ही प्रो सॉफ्टवेअरसह नवीन टचस्क्रीन आहे. नवीन रेंज रोव्हर डायनॅमिक एसई ट्रिममध्ये 2 इंजिनसह उपलब्ध होणार आहे. कंपनीने एसयूव्हीचे सिग्नेचर डिझाईन कायम ठेवत बाह्या आणि आतील भागात बदल केले आहेत. इव्होकची स्पर्धा भारतातील ऑडी क्यू5, मर्सिडीज बेंझ जीएलसी, बीएमडब्लू एक्स3 आणि वोल्वो एक्ससी 60 यांच्यासोबत असणार आहे.
अत्याधुनिक फिचर्स सोबत.
इव्होकच्या आतील भागात वायरलेस अॅपल कारप्ले, अँड्राईड ऑटोसह 11.4 इंच वक्र ग्लास टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, ड्यूअल झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, केबिन एअर प्युरिफायर, पॅनोरॅमिक सनरुफ, 3 डी सराउंडसह प्रगत कॅमेरा राहणार आहे.
2024 रेंज रोव्हर इव्होक पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 2.0-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 247 बीएचपी पॉवर आणि 365एनएम कमाल टॉर्क जनरेट करते.