महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओला एस 1 एक्स ईव्ही स्कूटर सादर

06:49 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

4केडब्ल्यूएच बॅटरी : पूर्ण चार्जवर 190 किमी धावणार : किंमत 1.10 लाख

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ओला इलेक्ट्रिकने मोठ्या बॅटरी पॅकसह एस 1 एक्स ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर केली आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही गाडी 190 किमी इतकी धावणार असल्याचा दावा कंपनीने यावेळी केला आहे. ई-स्कूटरच्या नवीन मॉडेलची किंमत ही 1.10 लाख रुपये राहणार असल्याची माहिती आहे.

एस एक्स ऑगस्ट 2023 मध्ये 2 केडब्ल्यूएच आणि 3 केडब्ल्यूएच बॅटरीसह सादर करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने बुकिंग सुरु केले आहे. या मॉडेलची डिलिव्हरी एप्रिलमध्ये सुरु होणार आहे. यासह कंपनीने देशभरात ओला सेवा केंद्र, चार्जिंग नेटवर्क व बॅटरी वॉरंटी वाढविण्याची घोषणा केली आहे.

डिझाइन आणि वैशिष्ट्यो

एस1एक्स स्कूटर कंपनीच्या इतर विद्यमान इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा डिझाइनमध्ये फारशी वेगळी नाही. यात स्मायली-आकाराचे ड्युअल-पॉड हेडलाइट्स, इंडिकेटर-माउंट फ्रंट ऍप्रॉन, रबराइज्ड मॅटसह फ्लॅट फूटबोर्ड, 34 लीटर बूट स्पेस आणि एलईडी टेल लॅम्प मिळतील. 7-इंचाचा ऊइऊ टचक्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील प्रदान केला आहे. तसेच, स्कूटरमध्ये एक सपाट प्रकारची सीट आणि सिंगल-पीस ट्यूबलर ग्रॅब रेलसह एलईडी टेल लॅम्प आहे. तळाशी ब्लॅक क्लेडिंग आणि स्टील व्हील देखील उपलब्ध आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article