डुकाटीकडून ‘डेझर्ट एक्स’ बाइक सादर
पॉवरफुल इंजिनची जोड : विविध वैशिष्टय़ांचा समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
डुकाटी इंडियाने सोशलमीडियावर स्वतःच्या आगामी मोटरसायकलचा नवा टीझर शेअर केला आहे. डुकाटीकडून आता नवी डेझर्ट एक्स ऍडव्हेंचर टूरर बाइक सादर करण्यात आली आहे. डेझर्ट एक्स डुकाटीची पहिली ऑफ-रोड ऍडव्हेंचर टूरर आहे.
डेझर्टएक्सचे भारतीय मॉडेल जागतिक व्हेरियंटच्या तुलनेत काहीसे वेगळे असणार आहे. या बाइकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे. यामध्ये कॉर्नरिंग एबीएस, ट्रक्शन कंट्रोल, बाय-डायरेक्शनल क्विक-शिफ्टर, व्हील कंट्रोल आणि इंजिन बेक कंट्रोल या सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. तसेच यात क्रूज कंट्रोलदेखील सामील असून ते रायडरच्या दीर्घ प्रवासाकरता उपयुक्त ठरणार आहे. या बाइकमध्ये फूल एलईडी लायटिंग सुविधा आहे.
डेझर्टएक्सला विशेषकरून ऑफ-रोड भागाचा विचार करून तयार करण्यात आले आहे. बाइकमध्ये 21 इंचाचे प्रंट आणि 18 इंचाचे रियर टायर उपलब्ध आहे. बाइकचा ग्राउंड क्लीयरेन्स 250 मिमी असून पिरेली स्कॉर्पियन रॅली एसटीआर टय़ुबलेस टायरने युक्त आहे. बाइकमध्ये 937 सीसीचे डेस्मोड्रोमिक इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 6 स्पीड गियरबॉक्ससह उपलब्ध आहे.