For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रियलमी 12’ ची 5-जी मालिका सादर

06:20 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘रियलमी 12’ ची 5 जी मालिका सादर
Advertisement

सुरुवातीची किंमत 16,999 रुपये : 108 एमपी कॅमेरा व मजबूत बॅटरी होणार उपलब्ध

Advertisement

नवी दिल्ली :

चीनी टेक कंपनी रियलमी यांनी भारतात मध्यम रेंजमधील रियलमी 12 हा 5-जी मॉडेलच्या स्मार्टफोनची आवृत्ती सादर केली आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये रियलमी 12 आणि रियलमी 12 प्लस अशा दोन मॉडेल्सचा समावेश राहणार असल्याची माहिती  दिली आहे.

Advertisement

रियलमी 12 प्लस स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.67 इंच आकारचा पूर्ण एचडी डिस्प्ले, 50 एमपी कॅमेरा व 5,000 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. कंपनीचे दोन्ही स्मार्टफोन दोन रंगात येणार आहेत.

शाओमी-14 होणार आज होणार लॉन्च

मोबाईल क्षेत्रातील चिनी कंपनी शाओमी आपला नवा शाओमी 14 स्मार्टफोन 7 तारखेला लॉन्च करणार असल्याची माहिती आहे. अनेक वैशिष्ट्यांसह हा फोन सादर होणार असल्याची माहिती आहे. 50 हजार ते 80 हजार रुपये किमतीला विविध प्रकारात सदरचा फोन खरेदीकरीता उपलब्ध होणार आहे. शाओमी 14 प्रो हा 6.36 इंच स्क्रीनसह येणार असून यात स्नॅपड्रॅगन 8 जन 3 चिपसेट असेल. पाणी आणि धूळ रोधक असा स्मार्टफोन असून 16जीबी रॅमसह येणार आहे. 50 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.

Advertisement
Tags :

.