For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरबीआयचे ‘प्रवाह’ पोर्टल सादर

06:11 AM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरबीआयचे ‘प्रवाह’ पोर्टल सादर
Advertisement

मोबाईल अॅपचाही समावेश : किरकोळ गुंतवणूकदारांना होणार मोठा लाभ

Advertisement

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने(आरबीआय) प्रवाह पोर्टल लाँच केले आहे. किरकोळ गुंतवणूकदार आणि इतरांसाठी यामुळे व्यवहार करण्यास सुलभ होणार आहे. आरबीआयच्या उपक्रमामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना आगामी काळात मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रवाह पोर्टलचा काय होणार लाभ

Advertisement

आरबीआयने प्रवाह पोर्टल लाँच केल्यानंतर, किरकोळ गुंतवणूकदारांना त्यांच्या मोबाईल फोनद्वारे रोखे खरेदी आणि विक्री करता येणार आहे. प्रवाह पोर्टल आरबीआयने 2021 मध्ये लॉन्च केले होते. दुय्यम बाजारात सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री सुलभ करते. निवेदनानुसार, फिनटेक रिपॉझिटरीचे लक्ष्य आर्थिक तंत्रज्ञान युनिट्स, त्यांचे क्रियाकलाप, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादींबद्दल आवश्यक माहिती मिळवणे आहे. थेट मोबाइल अॅप रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रिटेल डायरेक्ट मोबाइल अॅपद्वारे, गुंतवणूकदार नियामक मंजुरीसाठी घरबसल्या सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकतात. याशिवाय रोख्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याची आणि वेळेवर निर्णय घेण्याची सुविधा आहे.

अन्य बाबी...

  • या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये अनेक नियामकांमध्ये 60 विविध अॅप्लिकेशन फॉर्म समाविष्ट
  • आरबीआयचे हे मोबाईल अॅप्लिकेशन अँड्रॉईड व आयओएस दोन्हीवर उपलब्ध
  • ‘फिनटेक रेपॉजिटरी’ याशिवाय आरबीआयचा ‘फिनटेक रिपॉझिटरी’ उपक्रम सुरू
  • योग्य धोरण तयार करण्यासाठी फिनटेक कंपन्यांचा डेटा संग्रहित करणे हा उपक्रम सुरू करण्याचा उद्देश
  • रेपॉजिटरीमधील नियमन कक्षेच्या अंतर्गत आणि बाहेर येणाऱ्या दोन्ही वित्तीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या सहभागास प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट.
Advertisement
Tags :

.