महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रवेगची इलेक्ट्रिक एसयूव्ही डेफी सादर

06:38 AM Nov 26, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेड इन इंडिया एसयूव्ही ः सिंगल चार्जवर 500 किमी धावणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

बेंगळूर येथील इलेक्ट्रिक स्टार्टअप प्रवेग यांनी आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च केली आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 39,50,000 लाख रुपये असल्याची माहिती आहे. एसयूव्ही 51,000 रुपयांमध्ये बुकींग करण्याची सोयही कंपनीने केली आहे.

यामध्ये ही गाडी फक्त एका चार्जवर 500 किलोमीटर धावणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात 210 किमी/ताशी उच्च गती प्राप्त करणार असल्याचाही दावा केला आहे.  कंपनीने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये असणाऱया बॅटरीची क्षमता ही जवळपास 250,000 किमी इतक्या प्रवासापर्यंत मजबूत राहणार असल्याचे म्हटले आहे. प्रवेग की एसयूव्ही गाडीमध्ये बॅटरी पॅक चार्जिंगद्वारे 30 मिनिटांत 0-80 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो. यासोबतच ही गाडी तब्बल 11 कलरच्या पर्यांयांमध्ये बाजारात दाखल करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article