महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

घटनेच्या 10 व्या अनुसूची दुरुस्तीची मागणी करणारे खासगी विधेयक मांडा

01:03 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगावातील काँग्रेसजनांकडून पाटकर, युरी आलेमाव यांना निवेदन

Advertisement

मडगाव : सावियो कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली मडगाव येथील काँग्रेसजनांनी प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना विरोधी पक्षनेते वा काँग्रेस पक्षाचे आमदार किंवा इंडी आघाडीच्या कोणत्याही आमदारामार्फत खासगी सदस्य विधेयक सादर करण्याची विनंती करणारे निवेदन सादर केले आहे. कुतिन्हो यांनी माहिती दिली की,सदर खासगी सदस्य विधेयक भारताच्या संविधानाच्या दहाव्या अनुसूचितील दुऊस्तीशी संबंधित आहे.काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वारंवार होणाऱ्या पक्षांतरांमुळे मतदारांचा निवडणुकीतील प्रत्येक उमेदवारावरील विश्वास कमी होऊ लागला आहे. आम्ही संशोधन केले असता आम्हाला असे आढळून आले की, पक्षाने तत्कालीन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या माध्यमातून जुलै, 2021 च्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान खासगी सदस्य विधेयक मांडले होते. या विधेयकात भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीमध्ये योग्य ते बदल घडवून आणण्याची विनंती केंद्राला करणारा ठरावा घ्यावा, अशी मागणी केली होती.

Advertisement

निवडून आलेल्या आमदारांकडून लोभ आणि स्वार्थासाठी होणाऱ्या सर्रास पक्षांतराला आळा घालण्याच्या दृष्टीने ही मागणी करण्यात आली होती. या विधेयकाची स्थिती मात्र आम्हाला माहीत नाही, असे कुतिन्हो म्हणाले.अगदी आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे असतानाही काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्यासाठी कामत स्वत: आठ आमदारांच्या टीमचे कर्णधार झाले. कदाचित ते विधेयक मंजूर झाले असते, तर नैतिकतेच्या आधारे कामत यांनी पक्षांतर केले नसते, असे या निवेदनात म्हटले आहे. कामत हे प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षात सामील झालेले असल्यामुळे ते त्यांच्या नवीन टीमला भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी गरज पटवून देऊ शकतील. हे विधेयक सरकार पाडण्याच्या दृष्टीने पक्षांतराचा धोका लक्षात घेता सत्ताधारी पक्षासाठी देखील फायदेशीर ठरेल,असे कुतिन्हो यांनी उपहासाने सांगितले. सर्व काँग्रेसजन आणि गोमंतकीयांचे प्राथमिक हित या पक्षांतर करणाऱ्यांनी नव्या फेरीतून काँग्रेस पक्षात प्रवेश करू नये यात आहे,असे कुतिन्हो यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article