For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शारदा विद्यालय मळगाव येथे शालांतर्गत क्रीडा महोत्सव संपन्न

12:58 PM Mar 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
शारदा विद्यालय मळगाव येथे शालांतर्गत क्रीडा महोत्सव संपन्न
Advertisement

शाळा व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक संघाच्यावतीने आयोजन

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद प्रशालेत शाळांतर्गत घेण्यात आलेला क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह उत्साहात पार पडला. या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, उंचउडी, लांबउडी, १०० मीटर धावणे, ५० मीटर धावणे, रिले, ज्ञानी मी होणार आदी खेळांचा मुलांनी मनमुराद आनंद लुटला.स्पर्धेच्या युगात विशेषतः मुलांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करता यावी यासाठी शारदा विद्यालय मळगाव व्यवस्थापन समिती व पालक -शिक्षक संघाच्यावतीने या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. पहिली व दुसरी व तिसरी व चौथी अशा दोन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा महोत्सवाचे उदघाटन केंद्रप्रमुख शिवाजी गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर राऊळ,ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, शिक्षिका वर्षा गवस, अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, सुभाष नाटेकर, संजय नाटेकर, सीताराम नाईक, तुळशीदास नाईक, एकनाथ गावडे, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, अमित गावकर, अँथॉन फर्नांडिस,तळवडे बादेवाडी शाळा शिक्षिका राजश्री तारळकर, गीत गावडे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य स्वरा वारंग, गौरवी मेस्त्री, दिव्या पवार आदी उपस्थित होते. गट क्र.१ (इयत्ता पाहिली व दुसरी)-५० मीटर धावणे (मुलगे) प्रथम-श्लोक गजानन राऊळ, द्वितीय-गौरांग पंढरीनाथ गावकर, ५० मीटर धावणे (मुली) प्रथम-ज्योती धर्मेंद्र राजपूत, द्वितीय-ओवी गजेन्द्र गावडे, उंचउडी (मुली) प्रथम-श्रावणी प्रकाश गावडे, द्वितीय - ज्योती धर्मेंद्र राजपूत, उंचउडी (मुलगे) प्रथम-आशुतोष शिवराम तारळकर, द्वितीय - तन्मय सिध्देश तेंडोलकर, लांबउडी (मुली)-प्रथम-श्रावणी प्रकाश गावडे, द्वितीय-दुर्वा महेश पवार • लांबउडी (मुलगे) प्रथम-श्लोक गजानन राऊळ, द्वितीय-गौरांग पंढरीनाथ गावकर, रिले (मुली) प्रथम - लक्ष्मी ट्वेन्टीज, रिले (मुलगे) प्रथम- भूतनाथ सिक्टिन, जानी मी होणार. विजेता गट (आलिया राऊळ, ज्योती राजपूत, माही हरमलकर), तर गट क. २ (इयत्ता तिसरी व चौथी ) मधून १०० मीटर धावणे (गुलगे) प्रथम - नैनेश शिवप्रसाद गावकर, द्वितीय- भैया वाघू कोकरे, १०० मीटर धावणे (मुली). प्रथम युगा सिध्देश तेंडोलकर, द्वितीय- भूमी लक्ष्मण राणे, उंचउडी (मुलगे )-प्रथम सिध्देश संतोष गावडे, द्वितीय- विघ्नेश हरिश्चंद्र आसयेकर, उंचउडी (मुली)-प्रथम-भूमी लक्ष्मण राणे, द्वितीय- श्वेताकुमारी उमेश प्रसाद, लांबउडी (मुलगे) प्रथम-भैया वाघू कोकरे, द्वितीय- विघ्नेश हरिश्चंद्र आसयेकर, लांबउडी (मुली) प्रथम - संजना मुकेशकुमार रावत, द्वितीय - मानसी लक्ष्मण म्हाडेश्वर, रिले (मुलगे) प्रथम - जय श्रीराम स्पोर्ट्स, रिले (मुली) प्रथम - जिजाऊ स्पोर्ट्स, कबड्डी (मुलगे) विजेता - भूतनाथ सिक्टिन कबड्डी (मुली) - विजेता- जिजाऊ, स्पोर्ट्स, खो-खो (मुलगे) विजेता-भुतनाथ सिक्टिन, खो-खो-(मुली) विजेता लक्ष्मी ट्वेंटीज, ज्ञानी मी होणार-विजेतागट (ममता आसयेकर, श्रावण्या राऊळ युगा तेंडोलकर) यां सर्वांनी स्पर्धेत उज्ज्वल यश मिळविले. स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक प्रथम व द्वितीय येणाऱ्या सर्व स्पर्धकांना विशेष सन्मानचिन्ह तसेच मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेत क्रीडा महोत्सवला शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.