महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर ‘इंडोको’कडून मुलाखती रद्द

12:03 PM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विरोधी पक्षांनी केली होती हस्तक्षेपाची मागणी

Advertisement

पणजी : गोव्यातील विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केल्यानंतर इंडोको रेमेडीज औषध कंपनीने गोव्यातील प्रकल्पासाठी बोईसर-महाराष्ट्र येथे निश्चित केलेल्या नोकरभरतीच्या मुलाखती रद्द केल्या आहेत. कंपनीने तसे पत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवले आहे. डॉ. सावंत यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर सदर मुलाखती रद्दबातल ठरवण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. इंडोको फार्मा रेमेडीज या गोव्यातील औषध कंपनीच्या प्रकल्पात नोकर भरती करण्यासाठी बोईसर-महाराष्ट्र येथे मुलाखती घेण्यात आल्याबद्दल राज्यातील विरोधी पक्षांनी भाजप सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात टीका कऊन जोरदार आवाज उठवला आणि डॉ. सावंत यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. त्यानुसार डॉ. सावंत यानी त्यात लक्ष घातले. एकंदरीत परिस्थिती पाहून औषध कंपनीने शेवटी माघार घेतली.

Advertisement

गोव्यातील तऊण नोकऱ्यांसाठी तळमळत व वळवळत असताना राज्यातील सदर औषध कंपनीमधील नोकऱ्या राज्याबाहेरील लोकांना परप्रातीयांना देण्यात येत आहेत. गोमंतकीय बेकारांना गोव्यातच टाळले जात असून खासगी क्षेत्रातील 80 टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्याचा कायदा लागू करावा अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी या प्रकरणाचा जोरदार निषेध केला असून डॉ.सावंत यांनी त्यात तातडीने लक्ष घालून गोव्यातील नोकऱ्या परप्रांतीयांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्यात तेथे स्थानिकांना गोमंतकीयांना नोकऱ्या मिळाल्या पाहीजेत, असे कवठणकर यांनी म्हटले आहे. औषध कंपनी गोव्यात आणि मुलाखती महाराष्ट्रात याबद्दल रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) आश्चर्य व्यक्त कऊन गोव्यातील नोकऱ्या परप्रांतीयांना विकल्या असा आरोप पक्ष प्रमुख मनोज परब यांनी केला आहे. त्याला भाजपने सरकार जबाबदार असून स्थानिकांना नोकऱ्या राखीव ठेवण्याचे देण्याचे धोरण सरकारकडे नाही त्याचे हे परिणाम असल्याचे परब यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article