For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळूर ड्रग्ज प्रकरणात आंतरराज्य नेटवर्क

06:45 AM Dec 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूर ड्रग्ज प्रकरणात आंतरराज्य नेटवर्क
Advertisement

अमली पदार्थप्रकरणी चौघांना अटक : मुख्य सूत्रधार राजस्थानमधील असल्याचे स्पष्ट

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

महाराष्ट्र अमली पदार्थ विरोधी दलाच्या (एएनटीएफ) कोकण विभाग पोलिसांनी बेंगळुरातील तीन ठिकाणी ड्रग्ज कारखान्यांवर छापे टाकून 55.88 कोटी ऊपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची सखोल चौकशी सुरू केली आहे. आरजे इव्हेंटच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या ड्रग्ज कारखान्याचा शोध लागल्याने शहरातील नागरिकांना धक्का बसला आहे. राजस्थानमधील किंगपिन बेंगळुरात ड्रग्ज कारखाने चालवत आहेत. योगीराज कुमार आणि नयन पवर हे याचे प्रमुख सूत्रधार आहेत. ते केवळ कर्नाटकातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात ड्रग्ज कारखाने चालवत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र पोलीस उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.

Advertisement

अलिकडेच मुंबईत 1.5 कोटी ऊपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. यादरम्यान अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज तस्कर अब्दुल्ला खादर शेखने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीच्या आधारे प्रशांत यल्लप्पा पाटील याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, प्रशांत पाटीलने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र पोलिसांनी बेंगळूरच्या तीन ठिकाणी छापे टाकले आहेत. होरमावू, यरप्पनहळ्ळी आणि कण्णूरजवळ ड्रग्ज कारखाने सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणात आता कर्नाटक पोलिसांच्या मदतीनेही तपासाची सूत्रे हलविली जात आहेत.

छाप्यादरम्यान, पोलिसांनी 4.1 किलो घन एमडीएमए आणि 17 किलो द्रव एमडीएमए जप्त केले आहेत. याची किंमत 55.88 कोटी ऊपये इतकी आहे. राजस्थानमधील रहिवासी सूरज रमेश यादव आणि मलखान रामलाल बिश्नोई यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. या कारखान्यांवरून देशातील अनेक राज्यांना ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचा संशय आहे.

याठिकाणी टाकला छापा

ङ बागलूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील स्पंदन लेआऊट कॉलनी.

ङ एन. जी. गोल्लहळ्ळी परिसरात आर. जे. इव्हेंट नावाचा कारखाना.

ङ अवलहळ्ळी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील यरप्पनहळ्ळी येथील घर.

Advertisement
Tags :

.