For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंटरपोलकडून 6.5 अब्ज डॉलर्सचे ड्रग्ज जप्त

06:12 AM Sep 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
इंटरपोलकडून 6 5 अब्ज डॉलर्सचे ड्रग्ज जप्त
Advertisement

ऑपरेशन लायनफिश-मेयाग : भारतासमवेत 18 देशांमध्य कारवाई : 386 जणांना अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

इंटरपोलने अमली पदार्थांच्या विरोधात ‘लायनफिश-मेयाग 3’ अभियान हाती घेतले आहे. केवळ 2 आठवड्यांमध्ये भारतासमवेत 18 देशांमध्ये हे अभियान राबविण्यात आले असून याच्या अंतर्गत 76 टन अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 6.5 अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड आहे. या कारवाईत विक्रमी 297 दशलक्ष नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. अभियानात सामील यंत्रणांनी फेंटानिल, हेरॉइन, कोकेन आणि प्रीकर्सरचा मोठा साठा ताब्यात घेतला आहे. या अभियानादरम्यान 386 जणांना अटक झाली असून डार्कनेटवरील या अवैध व्यापाराच्या विरोधातही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

संबंधित अमली पदार्थ हे सर्फबोर्ड, टी-बॉक्स, कॅटफूड आणि कॉफी मशीनमध्ये लपविण्यात आले होते. जप्त करण्यात आलेले फेंटानिलचे प्रमाण हे 15.1 कोटी लोकांचा जीव घेण्याइतके होते. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी कारवाई असल्याचे इंटरपोलकडून सांगण्यात आले.

अधिकाऱ्यांनी एकूण 76 टन अमली पदार्थ जप्त केले असून यात 51 टन मेथामफेटामाइन सामील आहे. यात विक्रमी 297 दशलक्ष मेथच्या गोळ्या मिळाल्या आहेत, ज्यांना ‘याबा’ या नावाने ओळखले जाते. याचबरोबर फेंटानिल, हेरॉइन, कोकेन आणि अन्य केमिकल ड्रग्जही हस्तगत करण्यात आल्याचे इंटरपोलने स्वत:च्या वेबसाइटवर वक्तव्य जारी करत सांगितले आहे.

इंटरपोलचे ऑपरेशन लायनफिश-मायाग 3 हे 30 जून ते 13 जुलैपर्यंत राबविण्यात आले. आशिया आणि उत्तर अमेरिकेच्या 18 देशांमध्ये सिंथेटिक ड्रग्जची निर्मिती, तस्करी रोखण्यावर हे अभियान केंद्रीत होते. श्रीलंकेतील ऑपरेशन कोऑर्डिनेशन युनिटने आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये प्रत्यक्षवेळेत एकत्र काम करण्यासाठी विशेष अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांना एकत्र आणल्याचे इंटरपोलकडून सांगण्यात आले.

भारतातही कारवाई

इंटरपोलने भारतात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ‘केटामेलन’ नावाच्या एका मोठ्या डार्कनेट ड्रग्ज सिंडिकेटला नष्ट केले आहे. या अभियानाच्या परिणामादाखल एलएसडी ब्लॉट आणि केटामाइनसोबत सुमारे 87 हजार डॉलर्स मूल्याची डिजिटल संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तपासात संबंधित विक्रेता मागील 14 महिन्यांमध्ये 600 हून अधिक ड्रग्ज शिपमेंटसाठी जबाबदार होता असे समोर आले आहे. या अभियानादरम्यान सर्वाधिक पेंटानिल भारतातून जप्त करण्यात आले आहे. फेंटानिल एक ओपिऑइड ड्रग असून ते पूर्णपणे प्रयोगशाळेत तयार केले जाते.  परंतु याचे अवैधपणे भारतात उत्पादन पेले जात आहे.

Advertisement
Tags :

.