For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणमध्ये इंटरनेट सेवा ठप्प

06:10 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणमध्ये इंटरनेट सेवा ठप्प
Advertisement

इराणमध्ये इंटरनेट सेवा मागील 48 तासांपेक्षा अधिक कालावधीपासून ठप्प आहे. अमेरिका-इस्रायलच्या जारी हल्ल्यांदरम्यान इराणमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध होत नसल्याचे लोकांचे हाल वाढले आहेत. इराणच्या सरकारनेच देशात इंटरनेट शटडाउन केले आहे. इराणमध्ये यापूर्वी जानेवारी महिन्यातही दीर्घ कालावधीपर्यंत इंटरनेट सेवा रोखण्यात आली होती. त्यावेळी इराणच्या सुरक्षा दलांनी निदर्शने करणाऱ्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर छळ केला होता.

Advertisement

इराकच्या एरबिल विमानतळानजीक स्फोट

इराकच्या एरबिल विमानतळानजीक जोरदार स्फोट झाले आहेत. या विमानतळाचा वापर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्य आघाडीकडून केला जातो. यापूर्वी या भागात तैनात हवाई सुरक्षा यंत्रणेने विमानतळाच्या आसपास घोंगावणाऱ्या ड्रोनला नष्ट केले होते. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणविरोधात सुरू करण्यात आलेल्या सैन्य अभियानानंतर एरबिलच्या आकाशात अनेक ड्रोन दिसून आले आहेत. हे शहर अमेरिकेच्या वाणिज्य दूतावास परिसराचे केंद्र देखील आहे. यामुळे सुरक्षेवरून सतर्कता आणखी वाढविण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.