वेंगुर्ल्यात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात
पतंजली तर्फे योगदिनाचे आयोजन ; शिवसेनेकडून योग शिक्षक, योगसाधकांचे खास सत्कार
वेंगुर्ले (वार्ताहर)-
योग शारीरीक स्वास्थ , मानसिक शांती, अध्यात्मिक विकासाचे संतुलन साधतो. त्याचबरोबर श्वसनावर नियंत्रण, जीवनशैली सुधारणा होते. मनुष्य निरोगी राहण्यास योग हा सर्वात महत्वाचा आहे. जगात योगाला अनन्य साधारण महत्व आहे. योगामुळे बुध्दीमत्ताही प्रगल्भ होते. कोणतेही काम करताना सुयोग्य पध्दतीने ते करण्यास योग परीणामकारक ठरतो. हा योगा विशिष्ट नियमाने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योगांच्या कुठल्या प्रकारामुळे शरीरास काय लाभ होतो. याचे सुद्धा मार्गदर्शन मिळते. योग साधनेतून महिलांना उद्योग वा व्यवसाय करण्याची उर्जा मिळते. याचे उदाहरण म्हणजे जेष्ठ उद्योजिका सौ. मंदाकिनी दिलीप सामंत या आहेत. त्यांनी कित्येक वर्षे उद्योग सुरू करून महिलांना रोजगार सुध्दा दिलेला आहे. असे प्रतिपादन शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी योग दिनाच्या सत्कार कार्यक्रमात केले.वेंगुर्ले भटवाडी येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालयात पंतजली संस्थेच्या माध्यमातून मोफत योगाभ्यासचे धडे गेल्या ४ महिन्यांपासून दिले जात आहेत. त्या अनुषंगाने योगदिनाचे औचित्य साधून शनिवारी योग दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. या योगदिनाच्या कार्यक्रमास ९० पुरुष व महिला नागरीकांनी सहभाग घेतला.'जागतिक योग दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे योगाभ्यास देणाऱ्या गुरू पतंजली योग समितीचे सावंतवाडीतील अनिल मेस्त्री व अरुण पवार, वेंगुर्ल्यात नियमित योगाभ्यास चालू रहावा यासाठी ज्यांनी आपले सिध्दीविनायक मंगल कार्यालय हा हॉल योगासाठी मोफत दिला ते मंगल कार्यालयाचे संचालक दिलीप मालवणकर यांचा तसेच नियमित योग वर्गाला मार्गदर्शन करणारे संजय तेरेखोलकर व प्रणव येरम, जेष्ठ योग साधक उद्योजिका सौ. मंदाकिनी दिलिप सामंत, दयानंद आत्माराम नवार आदींचा वेंगुर्ले शिवसेना शहर शाखेच्यावतीने उमेश येरम यांनी शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान केला.योगदिन म्हणून एक दिवस योगा करून गप्प न रहाता आपल्या शरीर व मनाच्या तंदुस्तीसाठी लहान मोठ्या सर्व नागरीकांनी दररोज योगाभ्यास करावा. भटवाडी येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालयात मोफत योगाभ्यास सुरू आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पतंजली योग समितीचे शिक्षक अनिल मेस्त्री यांनी केले. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरात वैभवी तुळसकर, सीमा वरसकर, चित्रा प्रभू खानोलकर, जान्हवी कांबळी, उर्मिला येरम, आकांक्षा येरम, किरणप्रभा सावंत, दिव्या बागवे, श्रेया रेडकर, नम्रता गांवकर, सुकन्या तेंडोलकर, मंदाकिनी सामंत, रुपाली हरमलकर, अनुजा धारगळकर, स्वरा आचरेकर, अनिल मेस्त्री, अरुण पवार, उमेश येरम, प्रणव येरम, संजय तेरेखोलकर, दिलीप गिरप, बाळकृष्ण रेडकर, तातो नवार, दयानंद नवार, नागेश गांवकर, दिपक बागवे, संजय पराडकर, नरेंद्र पालव, विनोद वरसकर, लक्ष्मण तांडेल आदींचा समावेश होता.