For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी बुद्रुक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आज

10:53 AM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी बुद्रुक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आज
Advertisement

श्री कलमेश्वर मैदान मरगाईनगर येथे दुपारी 3 वाजल्यापासून लढतींना होणार प्रारंभ

Advertisement

 वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त श्री कलमेश्वर कुस्ती आखाडा, श्री कलमेश्वर कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थांच्यावतीने मंगळवार दि. 5 मे रोजी दुपारी 3 वाजता श्री कलमेश्वर मैदान मरगाईनगर वैकुंठधाम स्मशानभूमीच्या बाजूला भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान होणार आहे. या मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे अनेक मल्लांच्या लढती संपन्न होणार असल्यामुळे मैदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी श्री कलमेश्वर कुस्ती मैदान सज्ज झाले आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. सदर कुस्ती मैदानात प्रमुख लढत आंतरराष्ट्रीय पदक विजेता मिर्झा इराण व पंजाब केसरी भूपेंद्र अजनाला, दुसऱ्या क्रमांकाची लढत डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व जम्मू केसरी अमय बनीया,

Advertisement

तिसरी लढत आंतरराष्ट्रीय संकुलन पुणेचा रविराज चव्हाण व हरियाणचा रविंद्रकुमार, चौथी लढत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व समिर देसाई पुणे, पाचवी लढत कर्नाटक कंठीरवा केसरी कामेश कंग्राळी खुर्द व पृथ्वीराज पाटील पुणे, सहावी लढत कर्नाटक केसरी प्रकाश पाटील इंगळगी व बसवराज पाटील जमखंडी, सातवी लढत कर्नाटक चॅम्पियन प्रेम जाधव कंग्राळी व उदयराज आठव्या क्रमांकाची लढत पार्थ पाटील कंग्राळी व सुरज पाटील कोल्हापूर, याशिवाय श्री कलमेश्वर केसरी किताबासाठी  व गद्यासाठी लढत सुशांत पाटील-बी.के.कंग्राळी व राहुल नंदगड यांच्यात होईल.आकर्षण लढती म्हणून श्रीराज व अक्षक कोळी, ध्रुव मण्णिकेरी व उमेश, यासह 75 हून अधिक लढती होणार आहेत. प्रेक्षकांना कुस्त्या पहावयास मिळाव्यात म्हणून कुस्ती संघटनेने व्यवस्थित नियोजन केले असून कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.