For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मजगावात उद्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान

11:59 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
मजगावात उद्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान
Advertisement

भारत - रशिया, भारत - फ्रान्स अशी प्रमुख लढत

Advertisement

बेळगाव : मजगाव येथे ब्रम्हदेव कुस्तीगीर संघटना आयोजित भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलीचे आयोजन बुधवार दि. 8 एप्रिल रोजी ब्रम्हदेव कुस्ती आखाडा तलाव  आयोजित करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मैदानाचे सपाटीकरण व जास्तीत जास्त कुस्तीशौकीन बसण्याची व्यवस्था करण्याकडे प्राधान्य दिले जात आहे. या कुस्ती मैदानात महाराष्ट्राचा उगवता मल्ल सिकंदर शेख याला पराभूत केलेला महाराष्ट्र केसरी दादा शेळके व आंतरराष्ट्रीय खेळाडू जुबेर रशिया यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. दुसरी क्रमांकाची लढत सांगलीचा सुबोध पाटील व आंतरराष्ट्रीय मल्ल फ्रान्सचा विलियम यांच्यात होणार आहे.

तिसरी लढत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे दावणगिरी व राष्ट्रीय चॅम्पियन संदीपकुमार हरियाणा यांच्यात, चौथी लढत कर्नाटक कंठिरवा केसरी कामेश कंग्राळी व कोल्हापूरचा उमेश चव्हाण, शाहुपरी, पाचवी लढत कर्नाटक चॅम्पियन प्रेम जाधव कंग्राळी व हितेश पुणे, सहावी लढत रोहित मुडले महाराष्ट्र व प्रथमेश हट्टीकर कंग्राळी, सातवी लढत पार्थ पाटील कंग्राळी व मशिद शेख कोडूवाडी, आठव्या क्रमांकाची लढत दादू मोरे तुर्केवाडी व पृथ्वीराज पाटील कंग्राळी, नववी लढत निखील कंग्राळी व सिद्धारुढ धारवाड यांच्यात तर दहाव्या क्रमांकाची लढत प्रथम करडीकोप्प धारवाड व महेश तीर्थपुंडे यांच्यात होणार आहे.

Advertisement

याशिवाय 50 हून अधिक लढतींचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी प्रथमच महिलांच्या लढती आयोजित केल्या आहेत. प्रमुख लढत राधिका संतिबस्तवाड व भाग्यश्री स्पोर्ट्स हॉस्टेल, दुसरी लढत कल्याणी वाघवडे व प्रभा खादरवाडी, तिसरी लढत मनस्वी मजगाव व शिवानी वड्डेबैल, चौथ्या क्रमांकाची लढत ऋतुजा रावळ व खुशी खादरवाडी, पाचवी लढत रिया संतिबस्तवाड व चैतन्या स्पोर्ट्स हॉस्टेल याशिवाय अनेक लढती होतील. या मैदानात आकर्षण लढती म्हणून आर्यन मुतगा व मंथन सांबरा, पांडू तुर्केवाडी व गंधर्व येळ्ळूर, रिदांत मजगाव व चाळाप्पा संतिबस्तवाड, आकाश मजगाव व आरुष निलजी, केशव संतिबस्तवाड व सत्यम तेऊरवाडी, श्रीनिवास वाघवडे व आरव निट्टूर, गणेश मजगाव व सतीश देऊरवाडी यांच्यात होणार आहेत.

Advertisement
Tags :

.