महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांबरा येथे 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान

10:21 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रामस्थ-कुस्ती समितीच्या बैठकीत निर्णय

Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

सांबरा येथे होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त दि. 21 मे 2024 रोजी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरविण्याचा निर्णय रविवारी मारुती मंदिरात झालेल्या ग्रामस्थ आणि कुस्ती कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा तब्बल 18 वर्षांनी दि. 14 मे पासून सुरू होणार आहे. त्यानिमित्त दि. 21 मे रोजी कुस्ती आखाडा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील बसवाण्णा तलावात मैदान निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत सहकार्य करील, अशी ग्वाही यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी दिले. यावेळी हभप शिवाजी जत्राटी, इराप्पा जोई, सिद्राई य•ाr, लक्ष्मण सुळेभावी, नितीन चिंगळी, महेंद्र गोठे आदिनी विचार मांडले. बैठकीत मल्लांची जोड, देणगी जमा करणे, बैठक व्यवस्था, पार्किंग यासह इतर नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस लक्ष्मण य•ाr, विठ्ठल जत्राटी, परशराम हरजी, मुकुंद मुतगेकर, बाबू जोई, सिद्राई तिप्पनाचे, मनोहर नागन्नावर, देवाप्पा आप्पयाचे, गुरुनाथ चौगले, राजकुमार धनगर, कृष्णा अप्पायचे, मारुती चौगले यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी यल्लाप्पा हरजी यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article