जायंट्स मेनच्यावतीने जागतिक महिला दिन
सहा कर्तबगार महिलांचा सन्मान
बेळगाव : महिला दिनी त्यांचा कर्तृत्वाचा सन्मान करून त्यांना बळकटी देण्याचे काम जायंट्स मेन संस्थेने केले आहे, असे विचार समाजसेवक परशराम घाडी यांनी व्यक्त केले. जायंट्स मेन या सेवाभावी संघटनेच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. जायंट्स भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, प्रमुख पाहुणे परशराम घाडी, विभागीय संचालक शिवकुमार हिरेमठ, फेडरेशन संचालक संजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुऊवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून झाली. त्यानंतर आजच्या दिवसाचे औचित्य साधून कुटुंब सांभाळून सामाजिक कार्यातसुद्धा सहभागी असणाऱ्या काकती ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, कुटुंबाला हातभार म्हणून गेली दहा वर्षे महिला आघाडी या हॉटेलमध्ये कार्यरत असणाऱ्या राजश्री बांबुळकर,
कुस्तीपटू म्हणून नावारुपाला येत गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या अनेक पुरस्कारांच्या मानकरी आणि सध्या जिल्हा युवजन खात्यामध्ये कुस्ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या व एकलव्य पुरस्कारप्राप्त स्मिता बी. पाटील, तालुका पंचायत माजी सदस्या आणि सावगाव परिसरातील सतत क्रियाशील असणाऱ्या समाजसेविका निरा काकतकर, महिला सौहार्द व्रेडिट सोसायटीच्या सीईओ तन्वी वेलंगी व शाखा व्यवस्थापक प्रेरणा महागावकर यांचा शाल, स्म=ितचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मधु बेळगावकर, अजित कोकणे, प्रदीप चव्हाण, पुंडलिक पावशे, मुकुंद महागावकर यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. त्यानंतर सत्कारमूर्ती महिलांनी कृतज्ञतापूर्वक विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना यल्लाप्पा पाटील यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सचिव मुकुंद महागावकर यांनी तर आभार अजित कोकणे यांनी मानले.