For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हल्याळ व्हीडीआयटी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम

10:35 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
हल्याळ व्हीडीआयटी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम
Advertisement

बेळगाव : हल्याळ येथील केएलएस व्हीडीआयटी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहेत. अलीकडेच एआयसीटीईने घेतलेल्या कोर्समध्ये 23 विद्यार्थ्यांनी कोर्स पूर्ण केला आहे. तर 200 विद्यार्थी लवकरच हा कोर्स पूर्ण करतील. यामध्ये सायबर सेक्युरिटी, इम्बेडेड सिस्टीम व अँड्रॉईड डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांकडून यासाठी शुल्क घेतले जात नाही. याशिवाय हनीवेलने मायक्रोसॉफ्ट डाटा अॅनालिस्ट असोसिएट कोर्स प्रामुख्याने विद्यार्थिनींसाठी तयार केला असून, त्याचा लाभ 120 विद्यार्थिनींनी घेतला आहे. 350 विद्यार्थ्यांनी पायथॉन, एफडीएमए, आरड्युनिओ हा आयआयटी मुंबईचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. व्हीडीआयटी संस्थेने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 30 विविध संस्थांशी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत भागीदारी केली आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल चेअरमन विनायक लोकूर, प्राचार्य डॉ. व्ही. ए. कुलकर्णी, प्रा. रजत आचार्य, प्रा. नवीन हिरेमठ, डॉ.गुरुराज हत्ती व डॉ. पूर्णिमा रायकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.