For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचा पर्दाफाश

08:11 AM Feb 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचा पर्दाफाश
Advertisement

मुंबईजवळील समुद्रात भारतीय तटरक्षक दलाची कारवाई : तीन जहाजे ताब्यात

Advertisement

प्रतिनिधी/ वास्को

भारतीय तटरक्षक दलाने मुंबईच्या पश्चिमेस सुमारे शंभर सागरी मैल अंतरावर केलेल्या धडक कारवाईत आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचा पर्दाफाश केला. या तेल तस्करीमध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेटस् गुंतलेले असल्याचे उघडकीस आले आहे. तटरक्षक दलाने या भर समुद्रातील कारवाईत तीन जहाजे ताब्यात घेतली आहेत.

Advertisement

तटरक्षक दलाने गुरुवारी व शुक्रवारी असे दोन दिवस जहाजे रोखून ही कारवाई केली. त्यात आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचा पर्दाफाश झाला. सागरी हवाई नेटवर्कचा वापर करून ही कारवाई करण्यात आली. या तेल तस्करीमध्ये गुंतलेल्या जहाजांमध्ये  मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा व इंधनयुक्त माल होता. हा माल टँकर जहाजांना भर समुद्रात पुरवण्यात येत होता. या अवैध व्यवसायातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला जात होता. हा गैरव्यवहार तटरक्षक दलाने उधळून लावला. या तस्करीच्या व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्या गुंतलेल्या असल्याचे उघडकीस आले आहे. तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेल्या तिन्ही जहाजांच्या तपासणीत त्यांचा इलेक्ट्रॉनिक डेटा, कागदपत्रे हाती लागली आहेत. कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यामुळे या तस्कर टोळ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश पडला आहे. कुठल्याही कारवाईत अडकू नये यासाठी तस्करीत गुंतलेली जहाजे वारंवार आपली ओळख बदलत होती असेही आढळून आले आहे. सदर जहाजांचे मालक विदेशी असल्याचेही आढळून आले आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या तंत्रज्ञान समावेशक प्रणालींनी भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका मोटर टँकरचा प्रथम शोध घेतला होता.  त्यातूनच दलाला हा तस्करीचा व्यवहार रोखणे शक्य झाले. अधिक चौकशीसाठी या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेली जहाजे व जप्त करण्यात आलेला इतर माल मुंबईत तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. पुढील चौकशीत भारतीय सीमाशुल्क विभागाचाही सहभाग असणार आहे.

Advertisement
Tags :

.