महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंतरराष्ट्रीय खो-खो दिन उत्साहात

10:29 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : साधना क्रीडा संघ बेळगाव यांच्यावतीने पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय खो-खो दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष संजय बेळगावकर होते. याप्रसंगी खो-खो कोच प्रकाश देसाई, वैजनाथ चौगुले, चिन्नास्वामी व  शिवानंद कोरे यांनी आंतरराष्ट्रीय खो-खो दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले. यानतंर वेगवेगळ्या संघाच्या खेळाडूंनी आपल्या संघाच्या खो-खो खेळाचे प्रदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलेश बांदिवडेकर, ब्रम्हलींग हायस्कूलचे क्रीडाशिक्षक प्रकाश गोरल व शिवाजी गोरल यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला साधना क्रीडा संघाचे सदस्य, खो-खो संघाचे खेळाडू, खो-खो प्रेमी तसेच हितचिंतक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश नंदिहळ्ळी  यांनी केले तर शैलेश बांदिवडेकर यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article