For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा आढावा; 'फिल्म फायनान्स' योजना पुन्हा सुरू होणार : चित्रपट निर्माते आदित्य जांभळे यांचा विशेष सत्कार

10:26 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा आढावा   फिल्म फायनान्स  योजना पुन्हा सुरू होणार   चित्रपट निर्माते आदित्य जांभळे यांचा विशेष सत्कार
Advertisement

पणजी: गोवा मनोरंजन सोसायटीची सभा (ईएसजी) सर्वसाधारण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होऊन चालू नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. गोव्यातील चित्रपट निर्मात्यांसाठी असलेली आणि गेली काही वर्षे बंद पडलेली 'फिल्म फायनान्स' योजना पुन्हा सुरू करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ती येत्या ८ ते १० दिवसांत पुन्हा सुरू करून अर्थसहाय्य मिळणार असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय गोमंतकातील चित्रपट निर्माते आणि 'आर्टीकल ७०' हा चित्रपट तयार करणारे आदित्य जांभळे यांचा महोत्सवात विशेष सत्कार करण्याचे निश्चित झाल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. यंदाचा चित्रपट महोत्सव चांगला होण्यासाठी त्यांनी काही सूचना केल्या. ईएसजीच्या उपाध्यक्षा डिलायला लोबोंची समेला उपस्थिती होती.

Advertisement

ज्यांनी अर्थसहाय्य योजनेसाठी यापूर्वी अर्ज केले आहेत. त्यांना महोत्सवापूर्वी रक्कम मिळणार असल्याचे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले. त्या योजनेत आता काळानुसार बदल करण्याची गरज निर्माण झाली असून त्यानुसार त्या योजनेचा फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सूचित केले. त्यासाठी निर्माते दिग्दर्शक आणि इतर सर्व संबंधितातंकडून सूचना मागवल्या जातील. त्यांचा तसेच इतर अपेक्षांचा विचार करून योजनेत सुधारणा करण्याचा इरादा आहे. गोमंतकीय चित्रपट क्षेत्रातील कलाकार, इतर तंत्रज्ञ आणि सर्व संबंधितांनादेखील त्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारचे प्रयत्न आहेत, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

'कर्टन रेझन' सोहळा १२ रोजी दिल्लीत
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२६ या 'कर्टन रेझन' सोहळा येत्या १२ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे. त्यातून महोत्सवाची अधिकृत घोषणा राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणार आहे. महोत्सवातून गोव्याला आंतराष्ट्रीय स्तरावर चित्रपट क्षेत्राची अधिक व्यापक ओळख करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. स्थानिक चित्रपटांना देखील उत्तेजन मिळावे म्हणून गोव्यासाठी स्वतंत्र विभागही त्या महोत्सवात समाविष्ट करण्यात आल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

Advertisement

गोव्यातील चित्रपट क्षेत्रातील प्रतिभावंतांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करणे आवश्यक असून त्याच हेतूने जांभळे यांचा सत्कार होणार आहे. गोव्यातील चित्रपट क्षेत्र त्यामुळे अधिक समृद्ध होण्यास मदत मिळेल, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.