For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जादूगार केतन सावंत यांना इंटरनॅशनल एक्सनल्स अवॉर्ड प्रदान

11:41 AM Jan 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
जादूगार केतन सावंत यांना इंटरनॅशनल एक्सनल्स अवॉर्ड प्रदान
Advertisement

पनवेल येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर विचार मंचचा पुरस्कार

Advertisement

ओटवणे |  प्रतिनिधी
सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध जादूगार केतन सावंत याना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर विचार मंचचा इंटरनॅशनल एक्सनल्स अवॉर्ड
प्रदान करण्यात आला. पनवेल येथे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि मीसेस इंडिया इंटरनॅशनल दुबई २०२२ च्या मानकरी डॉ. शुभदा जगदाळे यांच्याहस्ते केतन सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी माजी खासदार सिरंगा आप्पा बारणे, माजी आमदार प्रशांतजी ठाकूर, झी २४ तासचे मुख्य संपादक निलेश खरे, तुफान लोकप्रिय अलबत्या गलबत्या या नाटकातील अभिनेते निलेश गोपनारायण, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड मंगेश नेने, संभाजीनगरचे समाजसेवक तथा अभियंता विवेक देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. जादूगार केतन कुमार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचें सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.