For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मल्याळी अभिनेता सिद्दीकीला अंतरिम दिलासा

06:31 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
मल्याळी अभिनेता सिद्दीकीला अंतरिम दिलासा
Advertisement

बलात्कार प्रकरणी तूर्तास अटक टळली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

न्यायाधीश हेमा समितीच्या अहवालानंतर मल्याळी चित्रपटसृष्टीवर दाटलेले संकटाचे ढग अद्याप दूर झालेले नाहीत. एका मागोमाग एका कलाकारावर कायदेशीर कारवाईची तलवार लटकू लागली आहेत. परंतु याचदरम्यान अभिनेता सिद्दीकीला दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बलात्कार प्रकरणी सिद्दीकला अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे.

Advertisement

युवा अभिनेत्रीकडून करण्यात आलेल्या आरोपांच्या आधारावर नोंद बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्दीकीला अटकेपासून अंतरिम संरक्षण प्रदान केले आहे. सिद्दीकीने याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आव्हान दिले आहे. न्यायाधीश बेला त्रिवेदी आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सिद्दीकीच्या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. यावेळी पीडितेच्या वतीने वरिष्ठ वकील वृंदा ग्रोवर यांनी युक्तिवाद केला. तर सिद्दीकीच्या वतीने वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली आहे.

Advertisement
Tags :

.