ZP Election : पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण अधिक, नेतेमंडळींची मोर्चेबांधणीस सुरुवात
मतदारसंघातील तिन्ही उमेदवार निवडून आणून आपली पकड मजबूत केली
By : प्रकाश सांडुगडे
पाटगाव : भुदरगड तालुक्यातील कडगाव पाटगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्यातील नेतेमंडळींनी आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. या मतदारसंघात पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण जास्त असल्याने ही निवडणूक पक्षीय होणार की गटावर होणार हे निवडणूक कार्यक्रम लागल्यानंतरच ठरणार आहे.
गतवेळेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कडगाव गटासाठी जनरल महिला असे आरक्षण होते तर कडगाव गणासाठी जनरल पुरुष व मठगांव गणासाठी ओबीसी महिला असे आरक्षण पहले होते. या मतदारसंघात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्थानिक राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन करून आपले उमेदवार उभे केले होते.
या मतदारसंघातील तिन्ही उमेदवार निवडून आणून आपली पकड मजबूत केली. मागील निवडणुकीत कडगाव पाटगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे नाव बदलून मठगाव जिल्हा परिषद मतदारसंघ असे करण्यात आले आहे. मठगाव जिल्हा परिषद मतदारसंघात राजर्षी शाहू आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली होती.
यामध्ये जिल्हा परिषदसाठी शाहू आघाडीतून माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या सूनबाई स्वरूपा सत्यजित जाधव, राष्ट्रवादी पक्षातून धनाजीराव देसाई गटाच्या सुनीता धनाजीराव देसाई तर भाजपमधून प्रभावती नामदेव देसाई यांनी निवडणूक लढवली होती. या चुरशीच्या लढतीत शाहू आघाडीच्या स्वरूपा जाधव विजयी झाल्या होत्या.
तसेच कडगाव पंचायत समितीमध्ये शाहू आघाडीतून नांदेकर गटाच्या कीर्ती देसाई, राष्ट्रवादीतून आर. के. देसाई व भाजपकडून तेजस्वीनी दिंगबर देसाई यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये शाहू आघाडीच्या कीर्ती देसाई यांचा विजय झाला होता. तर पाटगाव गणामध्ये शाहू आघाडीच्या उमेदवार सरिता संदीप वरांडेकर, राष्ट्रवादीच्या दीपाली महादेव पंदारे, भाजपकडून अनुसया पांडुरंग तळकर हे उमेदवार रिंगणात होते. यामध्ये शाहू आघाडीच्या सरिता वरंडेकर यांनी बाजी मारली होती.
गतवेळेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कडगाव गटासाठी जनरल महिला असे आरक्षण होते तर कडगाव गणासाठी जनरल पुरुष व मठगांव गणासाठी ओबीसी महिला असे आरक्षण पहले होते. या मतदारसंघात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्थानिक राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन करून आपले उमेदवार उभे केले होते. या मतदारसंघातील तिन्ही उमेदवार निवडून आणून आपली पकड मजबूत केली.
मागील निवडणुकीत कडगाव पाटगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे नाव बदलून मठगाव जिल्हा परिषद मतदारसंघ असे करण्यात आले आहे. मठगाव जिल्हा परिषद मतदारसंघात राजर्षी शाहू आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली होती. यामध्ये जिल्हा परिषदसाठी शाहू आघाडीतून माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या सूनबाई स्वरूपा सत्यजित जाधव, राष्ट्रवादी पक्षातून धनाजीराव देसाई गटाच्या सुनीता धनाजीराव देसाई तर भाजपमधून प्रभावती नामदेव देसाई यांनी निवडणूक लढवली होती.
या चुरशीच्या लढतीत शाहू आघाडीच्या स्वरूपा जाधव विजयी झाल्या होत्या. तसेच कडगाव पंचायत समितीमध्ये भुदरगड तालुक्यातील कडगाव पाटगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्यातील नेतेमंडळींनी आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.
या मतदारसंघात पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण जास्त असल्याने ही निवडणूक पक्षीय होणार की गटावर होणार हे निवडणूक कार्यक्रम लागल्यानंतरच ठरणार आहे शाहू आघाडीतून नांदेकर गटाच्या कीर्ती देसाई, राष्ट्रवादीतून आर. के. देसाई व भाजपकडून तेजस्वीनी दिंगबर देसाई यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये शाहू आघाडीच्या कीर्ती देसाई यांचा विजय झाला होता. तर पाटगाव गणामध्ये शाहू कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पक्षीय बलापेक्षा गटालाच महत्त्व जास्त आहे.
यामध्ये बिद्री कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई, कै. माजी आमदार दिनकरराव जाधव व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य के. जी. नांदेकर या तीन गटाचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत नांदेकर, जाधव गट आणि प्रकाश आबिटकर यांनी एकत्रित उमेदवार दिल्याने त्यांचा विजय सुकर झाला होता. पण मागील पाच वर्षातील राजकारणात बराच बदल झाला आहे.
यामध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्यजित जाधव यांनी पालकमंत्री आबिटकर यांची साथ सोडून माजी आमदार के. पी. पाटील गटाला साथ दिली आहे. त्यामुळे बदलत्या राजकारणात या मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी मौन घरले असून आरक्षण कसे असणार, यावरच त्यांची दिशा ठरणार आहे.