For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेनंतर जपानमध्ये वाढले व्याजदर

06:34 AM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेनंतर जपानमध्ये वाढले व्याजदर
Advertisement

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात पाव टक्का वाढ केली होती. त्यानंतर आता जपानमध्येही व्याजदर वाढवले गेले आहेत. जगभरात वाढत्या महागाईचा दबाव वाढताना दिसतो आहे. बँक ऑफ जपान या तेथील केंद्रीय बँकेने व्याजदर 1 टक्क्यांवरुन 1.25 टक्के इतके केले आहेत. जपानमध्ये व्याजदरात 31 वर्षात सर्वाधिक वाढ झाली आहे. इराण युद्धामुळे तेल व गॅसच्या किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम जपानमध्ये जाणवत आहेत. आपल्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी जपानला पश्चिम आशियावर अवलंबून राहावे लागते आहे.

Advertisement

याचदरम्यान अमेरिकेतील व्याजदर वाढीनंतर आता भारतात रिझर्व्ह बँकदेखील येत्या काळात व्याजदर वाढवू शकते, असे तज्ञांना वाटते आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.